"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

07. गुलाब पुष्प

                      07.  🔶 गुलाब पुष्प  🔶
 
     एक राजकन्या होती. एकदा राजवाड्यात एक ऋषी आलेले असताना तिने त्यांचा अपमान केला. त्यावेळेस क्रोधित झालेल्या त्या तपस्वी ऋषींनी तिला शाप दिला की, " दिवसभर तू गुलाब पुष्प होऊन राजवाड्याच्या समोरच्या बागेत गुलाबाच्या ताटव्यात राहशील. पण संध्याकाळ होताच राजकन्येच्या रुपात येऊन राजवाड्यात येऊन झोपू शकशिल. मात्र सकाळ होताच त्या गुलाब ताटव्यातील एक गुलाब होशील." हा शाप ऐकून तिने चुकीबद्दल ऋषीची क्षमा मागितली. ऋषींचा राग शांत झाल्यावर त्यांनी उपशाप दिला की, "जो कोणी ताटव्यातील गुलाबातून तुझा गुलाब ओळखून खुडेल, त्यावेळेस तुझी मुक्तता होईल." या उपशापाप्रमाणे राजाने अनेकांना आवाहन केले. पण कोणालाच गुलाब ओळखता येईना ! एक दिवस कौसर देशाचा राजकुमार आला. त्याने राजकन्येचा गुलाब ओळखून तो अलगद खुडला. त्याक्षणी राजकन्या शापमुक्त झाली.  " हा गुलाब तू कसा ओळखलास? असे राजाने विचारताच राजपुत्र म्हणाला, " महाराज, सोपं होत. रात्रभर राजकन्या महालात असते. व सूर्योदयानंतर गुलाबच फुल होते. तेव्हा संपूर्ण गुलाबाच्या ताटव्यातील फुले दवान भिजलेली असतील. पण सूर्योदयानंतर दव पडत नाही, म्हणजे राजकन्येच फुल कोरड असणार ! असा विचार करून मी योग्य ते फूलं तोडलं." राजा त्याच्या होशारीवर खुश झाला.
            *_🌀तात्पर्य_ ::~*
 सारासार विचार करून निर्णय घेतल्यास तो योग्य ठरतो.

No comments:

Post a Comment