"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

05. मुंगी व कबुतर

                      05.  💢 *मुंगी व कबुतर* 💢
   
   एका मुंगीला खुप तहान लागली म्हणून  ती  नदीच्या काठावर पाणी पिण्यासाठी गेली. तेंव्हा तिचा पाय घसरला व ती पाण्यात पडली. ते जवळचे झाडावर बसलेल्या कबुतरांने पाहिले बुडणा-या मुंगीची त्याला दया आली. पटकन त्यांने झाडाचे एक सुकलेले पानं मुंगीजवळ फेकले. मुंगी पानावर चढली आणि सुरक्षितपणे ती काठावर पोहोचली. तेवढ्यात तेथे एक फासेपारधी कबुतराला जाळे फेकणार  एवढ्या मुंगी फासेपारध्याच्या पायाला चावली.  त्यामुळे तो जोरात ओरडला. कबुतर त्यामुळे सावध झाले व फासेपारध्याला पाहून पळून गेले.  अशा प्रकारे कबुतराच्या सत्कर्माचे फळं त्याला लगेच मिळाले व त्याचे प्राण वाचले.

         *_🌀तात्पर्य_ ::~*
    संकटकाळी मदत करणारे हेच खरे मिञ.

No comments:

Post a Comment