"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

            03. *राष्ट्रसंत तुकडोजी महाराज*
   
  *भारतामध्ये नवचैतन्य जागवणारा देशभक्त...!!*

         "हो चीड़ झूठे राह की
        अन्याय की अभिमानकी"
 
        असत्याला गाडून टाकन्याची आणि अन्यायाचा प्रतिकार करण्याची हिम्मत प्रत्येकाच्या अंगी असाविच, तरच त्या व्यक्तिमधला स्वाभिमान जीवंत राहतो. भजना-कीर्तनाच्या माध्यमातुन समाजसेवा, लोकजागृती, प्रबोधनवादी भजने यासारख्या अनेक क्रांतीतत्त्वातून संत महाहरुषांच्या विचारांचा पुरोगामी वाससा जपणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज खऱ्या अर्थान् एक महान कर्मयोगी होते..

      राष्ट्रसंतांच शिक्षण जेमतेम 3 ऱ्या वर्गापर्यंतच होत परंतु 1955 च्या विश्वधर्म परीशदेतील जपानला झालेल महाराजांच क्रांतिकारी भाषण त्यांच्या अफाट विद्वत्तेची साक्ष देते..ज्यांनी आपल् आयुष्य रंजल्या गांजल्या सामजासाठी देशासाठी वेचल् त्याना आजही या अपमानाच्या आगीत जाळाव यापेक्षा मोठी शोकांतिका दूसरी काय आहे... निवृति वक्ते सारख्या एका धर्मविचावाने ग्रामगीतेवर अत्यंत खालच्या भाषेत टीका केली याचा जाहीर निषेध् मी आजही करतो आणि उद्याही करेलच! म्हणावे तरी काय या संतद्रोहयाला...?

तथागत बुद्धांचा संदेश जगात पोहचवणारी ग्रामगीता ।।।
गंजेटी भोंदू साधुनवर प्रहार करणारी ग्रामागीता।।।
मानसामानसातील समूळ भेदभाव नष्ट करणारी ग्रामगीता ।।।
डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे आणि संविधानाचे भारतावर खुप मोठे उपकार आहेत हे सांगणारे ग्रामगीता।।
अंधश्रद्धा, दैववाद, कर्मकांडाला झुगारून पुरोगामी विचार देणारी ग्रामगीता ।।।

      अपृश्याच्या स्पर्शानेही विटाळ् होतो असं म्हणाणाऱ्या कुविचारी लोकांना काशी काय आपली वाटणार! मी तर म्हणेल हे त्यांच्यासाठी नाहीच कारण त्यांची ती लायकी नाही..संत विचारांचा वारसा आपल्या धमन्यात खेळवायाला माणूस मर्द असावा लागतो..! विचारांचा खरा खुरा वारसदार असावा लागतो..! संत तुकोबारायांच्या भाषेत शेवटी एकच सांगतो....
   
      तुका म्हणे येथे पाहीजे जातीचे।
      येऱ्या गाबाळ्याचे कामा नाही ।
       

No comments:

Post a Comment