"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

               03. *✹अजिंक्य भारतमाता ✹*
     
दिशादिशांतुन कोटि मुखांतुन निनाद एकच आता
अजिंक्य आमुची भारतमाता जय जय भारतमाता॥धृ॥

इथे जान्हवी नित्य वहाते घेउन अमृतधारा
इथे झुळझुळे मलयगिरीचा शीतल गंधित वारा
धवल हिमालय या भूमीचा जगात उन्नत माथा॥१॥

इथे जन्मले राम दाविण्या कर्तव्याचा पंथ
कृष्ण सांगती धनंजयाला अमोल गीताग्रंथ
वेदामधुनी इथे वाहती ज्ञानसुधेच्या सरिता॥२॥

बालशिवाही इथे न झुकवी अधमापुढती मान
प्रतापराणा रणराणीचा असे अम्हा अभिमान
इतिहासातुन इथे रंगते पुरुषार्थाची गाथा॥३॥

मानवतेची चाड अम्हांपरि दानवतेची चीड
सत्यासाठी मनी न कधिही धरु भीति वा भीड
प्राणदीप हा विझवू हासत आम्ही देशाकरिता॥४॥
        ●~~●~~●~~◆~~●~~●~~●

No comments:

Post a Comment