"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

पंजाबराव देशमुख

                      06.  पंजाबराव देशमुख  
     भारतातील शेतकरी समृद्ध करण्या साठी संपर्ण जीवन समर्पण करणारे, भारताचे पहिले कृषीमंत्री , ज्यांचा आग्रहामुळे पहिली पंचवार्षीक योजना कृषीवर आधारीत होती, ज्यांनी दुर्गमभागात शाळामहाविद्यालय काढून बहुजन समाजा करीता शिक्षण उपलब्द करून दिले, ज्यांनी पहिले जागतिक कृषीप्रदर्शन भरवीले, ज्यांनी अनेक कृषी विद्यापीठ काढली,  संविधान निर्मीती मध्ये ज्यांचे महत्वाचे योगदान आहे , ज्यांचा डाॅ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, सुभासचंद बोस, गाडगेबाबा, तुकडोजी महाराज ई. महामानव सन्मान करीत होते असे थोर महामानव....

डॉ. पंजाबराव देशमुख  ( भाऊसाहेब देशमुख)
🔹जन्म :~ २७ डिसेंबर १८९८
पापळ, अमरावती
🔸मृत्यू :~ १० एप्रिल १९६५, दिल्ली
🔹प्रशिक्षणसंस्था :~
          श्री शिवाजी शिक्षण संस्था

          *💎पंजाबराव देशमुख*
   यांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील पापळ या गावी झाला. उच्च शिक्षण घेऊन स्वातंत्र्यायच्या लढ्यात ते सहभागी झाले. इ.स. १९३६ च्या निवडणुकीच्या नंतर शिक्षणमंत्री म्हणून त्यांनी काम पाहिले. स्वतंत्र भारतात कृषी मंत्री म्हणून त्यांनी काम केले आहे. विदर्भात शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी श्री शिवाजी शिक्षण संस्था काढली. या संस्थेच्या पश्चिम विदर्भात म्हणजे अमरावती विभागात अंदाजे १,००० च्या वर शाळा आहेत. महाविद्यालये , अभियांत्रिकी पदवी , तसेच पदविका तंत्रनिकेतन , कृषी महाविद्यालय, वैद्यकीय महाविद्यालय असे अनेक महाविद्यालये सुरू करून आज शिक्षण क्षेत्रात फार मोठं योगदान देत आहे.

             *♦संक्षिप्त जीवन*
🔻डॉ. पंजाबराव देशमुख ( भाऊसाहेब देशमुख) मूळ आडनाव - कदम

🔸१९२७- शेतकरी संघाच्या प्रचारासाठी 'महाराष्ट्र केसरी' हे वर्तमानपत्र चालविले.

🔹वैदिक वाङ्मयातील धर्माचा उद्गम आणि विकास' या प्रबंधाबद्दल डॉक्टरेट.

🔻१९३३ - शेतकऱ्यांची कर्जातून मुक्तता करणारा कर्ज लवाद कायदा पारीत करण्यात मोठा वाटा. त्यामुळे त्यांना हिंदुस्थानच्या कृषक क्रांतीचे जनक म्हणतात.

🔸१९२६ - मुष्टिफंड या माध्यमातून गरीब होतकरू विद्यार्थ्यांसाठी श्रद्धानंद छात्रालय काढले.

🔹१९२७ - शेतकरी संघाची स्थापना.

🔻१९३२ - श्री. ए. डब्ल्यू. पाटील यांच्या सहकार्याने श्री शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना .

🔸ग्रामोद्धार मंडळाची स्थापना.

🔹१९५० - लोकविद्यापीठाची स्थापना (पुणे), त्याचे नंतर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात रुपांतर करण्यात आले.

🔻१९५५ - भारत कृषक समाजाची स्थापना व त्याच्याच विद्यमाने 'राष्ट्रीय कृषी सहकारी खरेदी विक्री संघाची स्थापना.

🔸१९५६ - अखिल भारतीय दलित संघाची स्थापना.

🔹'भूतकाळ विसरा, तलवार विसरा, जातिभेद पुरा, सेवाभाव धरा'.

🔻१८ ऑगस्ट १९२८ - अमरावती अंबाबाई मंदिर अस्पृश्यांसाठी खुले व्हावे म्हणून सत्याग्रह .

🔸१९३० - प्रांतिक कायदे मंडळावर निवड. शिक्षण, कृषी, सहकार खात्याचे मंत्री

🔹लोकसभेवर १९५२, १९५७, १९६२ तीन वेळा निवड.

🔻१९५२ ते ६२ केंद्रीय मंत्रिमंडळात कृषिमंत्री. भारताचे पहिले कृषीमंत्री.

🔸देवस्थानची संपत्ती सरकाराने ताब्यात घेऊन विधायक कार्य करावे या उद्देश्याने १९३२ मध्ये हिंदू देवस्थान संपत्ती बिल मांडले.

🔹प्राथमिक शिक्षकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्राथमिक शिक्षक संघाची स्थापना.

🔻१९६० - दिल्ली येथे जागतिक कृषी प्रदर्शन भरवले.

No comments:

Post a Comment