"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

01.बेडूक आणि उंदीर

             01.  ★बेडूक आणि उंदीर★
                   
   एक उंदीर आणि एक बेडुक एकमेकांचे मित्र होते. बेडूक उंदराच्या घरी जाऊन वारंवार पाहुणचार घेत असे. त्याने उंदरालाही आपल्या घरी येण्याचा आग्रह केला. परंतु वाटेत पाणी असल्याने 'मी येऊ शकत नाही,' असे सांगून उंदीर ते टाळीत असे. परंतु एकदा बेडकाने खूपच आग्रह केला व त्याचा एक पाय आपल्या एका पायाला बांधून पाण्यातून निघाले.

   वाटेत बेडकाच्या मनात आलं की, उंदराला पाण्यात बुडवून टाकले म्हणजे त्याच्या बिळातले सर्व अन्न आपल्याला मिळू शकेल म्हणून त्याने पाण्याच्या तळाशी बुडी मारली. तेव्हा उंदीर जोरजोरात ओरडून धडपड करू लागला. त्याचा आवाज ऐकून, आकाशातली एक घार खाली आली आणि उंदराला तोंडात धरून उंच उडाली. उंदराच्या पायाला बेडकाचा पाय बांधला असल्यामुळे तोही पकडला गेला. घारीने उंदराबरोबर त्यालाही खाऊन टाकले.

      *_🌀तात्पर्य_ ::~*
*विश्वासघात करणार्‍या माणसाला प्रायश्चित्त हे मिळतेच*.

5 comments:

  1. आदरणीय सर,
    डाऊनलोड पर्याय नाही ओ.इतर माहिती मस्त आहे.
    धन्यवाद!

    ReplyDelete
  2. खूप छान ब्लॉग सुंदर माहिती

    ReplyDelete
  3. ऐक नंबर आहे बोधकथा

    ReplyDelete