"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

17. *❃ गैरसमज ❃*

                                        17.  *❃ गैरसमज ❃*  
                                           
     एका जंगलात राम सावित्री नावाच एक जोडपं राहत असत,राम हा जंगलात जाऊन लाकूडे तोडायचा आणि ती जवळच्या शहरात जाऊन विकायचा...काही दिवसांनी त्यांच्या घरात एक सुंदर बाळ जन्माला येत.;
 एक दिवस त्याला जंगलात एक निरागस आणि घाबरलेल मुंगूसाच
पिल्लू दिसत जवळच  कोणत्यातरी जंगली श्वापदाच्या हल्ल्यात त्याची आई मरून पडली होती..राम त्या पिल्लाला घरी आणतो.थोड्या दिवसांतच ते पिल्लू त्या घरात एखाद्या
सदस्यां प्रमाणे रूळते...

     एक दिवस राम नेहमीप्रमाणे जंगलात आपल्या कामासाठी न्याहारी करतो आणि  निघून जातो... नंतर थोड्या वेळाने  आपल्या बाळाला झोपवून  सावित्री  पाणी आणण्यासाठी निघून जाते.घरात फक्त बाळ आणि ते माणसाळलेल मुंगूस.... काही वेळातच त्या घरात एक भला मोठा साप शिरला आणि तो त्या बाळाकडे चाल करू लागला ... मुंगूसाने चपळाईने सापावर झडप मारली आणि सुरु झाली लढाई..साप पण बलाढ्य होता पण मुंगूसाने त्याच्यावर मात केली मुंगूसाचे   तोंड आणि पूर्ण शरीर सापाच्या रक्ताने
माखले होते... आता मुंगूस दारात उभे राहून सावित्रीची वाट बघत होते..... तेवढ्यात सावित्री डोक्यावर हंडा घेऊन आली आणि बघते तर काय मुंगूसाचे तोंड आणि पूर्ण शरीर रक्ताने  माखले होते सावित्रीच्या डोक्यात एकच विचारांच वादळ ऊटल की तीच्या बाळाचे लचके त्या मुंगूसाने तोडले आणि त्याला मारुन  टाकले... पण मुंगूस मात्र सावित्रीकडे खूप निरागसपणे बघत होते. मात्र त्याचवेळी सावित्रीने बाळाच्या नावाने एकच टाहो फोडला आणि क्षणार्धात डोक्यावरील हांडा तीने त्या मुंगूसाच्या अंगावर फेकला आणि घरात पळत सुटली पण घरात जाताच तीला चित्र वेगळंच दिसलं तीच बाळ अजूनही झोपलच होत आणि शेजारीच तो भयानक साप रक्ताच्या थारोळ्यात मरून पडलेला.... सावीत्री भानावर आली आणि सर्व प्रकार तिच्या लक्षात आला तशी ती चपळाईने उठली आणि बाहेर आली.. पण मुंगूस बिचारे जागेवर  ठार झालते  सावित्रीने पुन्हा एकदा  टाहो फोडला पण यावेळी तीचे दोन्ही हात जोडलेले होते....

                      *_🌀❝ तात्पर्य ❞ ::~_*
     स्वामी विवेकानंद सांगतात जे दिसतय ते बघा पण त्याचाआधी जे दिसत नाही ते शोधायचा प्रयत्न करा.... कारण प्रश्न हा जीवलग माणूस गमवण्याच्या आहे... कारण गैरसमज हे जवळच्या माणसांकडूनच होतात

No comments:

Post a Comment