"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

                          27. *❃ नकारात्मक विचार ❃* 
                                                 
          एक प्रवासी पायी चालत दूरच्या प्रवासाला निघाला होता. उन्हाळ्याचे दिवस होते. दुपारची वेळ होती. प्रवाशाच्या प्रवास सुरूच होता. त्याला प्रचंड थकवा आला होता. काही अंतर गेल्यावर रस्त्याच्या कडेला त्याला एक खूप मोठे झाड लागले. त्याला आनंद झाला. तो त्या झाडाखाली जाऊन बसला. तिथे त्याला खूप गारवा जाणवला. काही वेळाने त्याच्या मनात विचार आला "येथे जर थंड पाणी मिळाले तर...' अन काय आश्चर्य पुढच्याच क्षणी त्याच्या समोर पाण्याचा थंडगार माठ आला. प्रचंड थकवा आल्याने त्याने ते पाणी पिले. त्याला आणखी शांत वाटले. इतर कोणताही विचार न करता त्याच्या मनात काही वेळाने विचार आला "पाणी मिळाले. चांगले मिष्टान्नाचे जेवण मिळाले तर...' अन काय आश्चर्य दुसऱ्याच क्षणी त्याच्या समोर मिष्टान्नाचे ताट हजर झाले. प्रवासी प्रचंड थकला होता. त्याला खूप भूक लागली होती. त्यामुळे त्याने कोणताही विचार न करता जेवण केले. जेवण झाल्यावर तो खूप समाधानी झाला आणि पुन्हा त्याच्या मनात विचार आला, "पाणी मिळाले, जेवण मिळाले आणि झोपायला छान गादी मिळाली तर...' आणि पुढच्याच क्षणी त्याला छानशी गादी मिळाली. कोणताही विचार न करता तो गादीवर निद्रित झाला. काही वेळाने पुरेशी झोप झाल्यानंतर तो उठला. पुढच्या प्रवासाला जायला निघाला. मात्र अचानक त्याला झाडाखाली आल्यापासून घडलेल्या सर्व घटना आठवल्या. तो प्रचंड घाबरला. त्याच्या मनात विचार आला, "हा काहीतरी चमत्कारिक प्रकार आहे. कदाचित इथं भूत असेल. अरे बापरे! भूत आलं आणि त्याने आपल्याला खाऊन टाकलं तर...' दुसऱ्याच क्षणी त्याच्या समोर एक भूत आलं आणि त्याने त्या प्रवाश्याला खाऊन टाकले.

        *_🌀❝ तात्पर्य ❞ ::~_*
   आपले मन ही या कल्पवृक्षासारखे आहे. त्यामुळे तुम्ही सतत चांगला विचार करत रहा. त्यामुळे तुम्ही जो चांगला विचार कराल त्याला प्रयत्नांची जोड देऊन तुम्हाला हवी ती गोष्ट मिळू शकेल. मात्र कधीही नकारात्मक विचार करू नका. त्याने तुमचा घात होईल.'

1 comment:

  1. सर खरच खूपच सुंदर blog आहे. 👌👌👌👌👌 सध्या मी पण माझा blog केला आहे. पण आपणा एवढा मला सजविता नाही आला. आपण माझ्या blog ला visit देवून मला तो कसा सजविता येईल या संदर्भात आपले मार्गदर्शन मिळाले तर मी आपली आभारी राहीन. माझा blog - drhemlatakate.blogspot.com

    ReplyDelete