"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

                      28. *❃ सखू आणि बकू ❃* 
                                             
        एका गावात दोन पक्क्या मैञिनी शेजारी शेजारी राहत होत्या, एक सखू व एक बकू. सखू नवर्याची भक्ति म्हणून खूप सेवा करायची तर बकू सारखी नवर्याला रागाने बोलायची.
एक दिवस सकाळी सकाळी बकूची साखर संपली म्हणून सकाळीस बकू सखू कडे उसनी साखर मागायला आली तेव्हा सखू मूसळाने धान्य कूटत बसली होती, साखर मागताच सखू ने मूसळ हवेतच थांबविले व आतमध्ये साखर आणायला गेली हे बघून बकूला धक्काच बसला कारण मूसळ हवेत तोपर्यंत तरंगत होते, तिने सखूला विचारले हे कसे शक्य आहे त्यावर सखू म्हणाली शक्य आहे परंतु याकरिता नवर्याची भक्ति करावी लागते. मला भक्तिचा ऊपाय सांग असे बकू म्हणाली, तेव्हा सखू ने सांगितले की फारच सोपे आहे. रोज सकाळी नवरा झोपून ऊठला कि त्याला गरमागरम चहा दे, नंतर कडकडत्या पाण्याने आंघोळ घालून दे, गरमागरम जेवण खावू घाल म्हणजे झाली भक्ति.
       हे ऐकून बकूने विचार केला कि मी सूद्धा ऊद्यापासून अशीच सेवा करते म्हणजे माझे ही मूसळ हवेत तरंगेल.
झाले दूसरे दिवशी बकू सकाळी लवकर ऊठली नवर्याला लवकर ऊठविले व बाहेरून यायला सांगितले लगेच तिने चहा उकळला,  नवऱ्यानं विचारले हे काय करते तर ती म्हणाली मला तूमची भक्ति करायची आहे, कडकडता चहा त्याला प्यायला दिला व एका दमात तोंडात ओतला त्यामूळे त्याची जीभ पोळली परंतु बकू माञ नवर्याची आंघोळ करायचे तयारीला लागली व म्हणाली ऊठा आंघोळ करून देते, कडकडते गरमागरम पाणी नवर्याच्या अंगावर ओतलं त्यामूळे त्याला फोडसूद्धा आलेत त्याची तिला पर्वा नव्हती नंतर गरमागरम जेवणाने तर त्या बिचार्याचे तर हाल बेहाल झाले व तो बेशूद्ध झाला पण बकूला तर मूसळ हवेत तरंगवायचे होते, तिला वाटले की सखूने सांगितलेल्या प्रमाणे सेवा केली म्हणून मूसळ ऊखळात घेवून धान्य कूटायला सूरूवात केली व मूसळ वर हवेत फेकून म्हणाली कि मूसळा थांब आणी वर तोंड करून पाहू लागली परंतु मूसळ सरळ तिच्या तोंडावर आदळले आणि तिची बत्तीसी बाहेर आली. माञ मूसळ काही हवेत तरंगले नाही.

                            *🌀❝ तात्पर्य ❞ ::~*
      भक्ति व सेवा मनोभावे व स्वच्छ मनाने केल्यासच वांछित फळ देते त्यामध्ये दिखावा किंवा ढोंग असल्यास नुकसान सूद्धा होते. 

1 comment:

  1. छान गोष्टीआहेत मुलांना बोधघेन्या सारख्या.

    ReplyDelete