"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

बोधकथा ~ सुयोग्य निर्णय

   एक कुंभार मातीची चिलम बनवित होता. चिलमचा आकार केला सुध्दा ! पण थोड्याच वेळात त्याने तो आकार बदलला !

   मातीने विचारले, "अरे कुंभार दादा, तु छान चिलीम बनविली होती. मग का परत बदल केला?"

   कुंभार म्हणाला, "मी चिलम बनवत असताना माझी मति बदलली आणि घागर बनविण्याचा निर्णय घेतला !"

   मातीने म्हणाली, "कुंभार दादा, तुमची मति बदलल्या मुळे, माझे जीवन बदलले ! मी चिलम झाले असते तर मी ही जळाले असते आणि दुसऱ्यांना ही जाळले असते ! आता मी घागर झाल्यावर मी ही शीतल राहिल आणि इतरांना ही शीतलता देइल !" 

                         *_🌀तात्पर्य_ ::~*
      जीवनात सुयोग्य निर्णय घेतल्यास, आपल्याला ही आनंद मिळतो आणि आपल्या मुळे इतरांना ही आनंद मिळतो.

No comments:

Post a Comment