"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

थोरपुरुष माहिती क्रं. 57

                           57. *❒ सुखदेव थापर ❒* 
                          ━━═•●◆●★●◆●•═━━
●जन्म :~ १५ मे, इ.स. १९०७
●मृत्यू :~  २३ मार्च, इ.स. १९३१

                  ◆ सुखदेव थापर◆
      हे भारतीय स्वातंत्र्यसेनानी होते. त्यांचा जन्म लुधियाना येथे झाला होता. यांचा इ.स. १९२८ मध्ये जे.पी. सॉण्डर्स यास यमसदनी धाडण्याच्या कटात सहभाग होता.

    भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू या तिघांनाही लाहोर जेलमध्ये २३ मार्च, इ.स. १९३१ ला संध्याकाळी ७.३३ ला फासावर चढवण्यात आले. त्यानंतर त्यांचे मृतदेह काराग्रहाच्या मागील भिंती फोडून गुप्तपणे काढले गेले व त्यांचा लाहोरपासून अंदाजे ५० मैल दूर हुसैनीवाला या ठिकाणी सतलज नदीकिनारी अंत्यसंस्कार करण्यात आला . ते मृतदेह त्वरित गाडता यावेत म्हणून त्याचे कापून लहान लहान तुकडे करण्यात आले.

"भगतसिंग,राजगुरू व सुखदेव या महान क्रांतिकारकांना शतशः नमन."

                      ●~~●~~●~~◆~~●~~●~~●

No comments:

Post a Comment